निक्की हेलींवरील टिप्पणीमुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत

वॅाशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि आगामी निवडणुकीतील रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्राध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार डोनाल्ड ट्रम्प आपल्या बेलगाम वक्तव्यांमुळे नेहमीच वादात असतात. आत्ताही त्यांनी रिपब्लिकन पार्टीच्या अन्य एक दावेदार निक्की हेली यांच्या मूळ वंशावरून केलेल्या टिप्पणीमुळे अडचणीत आले आहेत.

डेमॅाक्रेटीक पार्टीचे नेते राजा कृष्णमूर्ती यांनी या मुद्यावरून ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.ट्रम्प यांच्या टिप्पणीने तमाम दक्षिण आशियाई अमेरिकन नागरिकांचा अपमान केला आहे,अशी टीका कृष्णमूर्ती यांनी केली. दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये निकी हेली यांचा उल्लेख निम्रता या मूळ नावाने केला होता. तसेच निक्की या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास पात्र नाहीत. कारण निक्की यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आई-वडिलांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले नव्हते,अशी टिप्पणी केली होती.निक्की या मूळच्या भारतीय वंशाच्या आहेत,अमेरिकन नव्हे ,असे ट्रम्प यांना सुचवायचे होते. आता डेमॅाक्रेटीक पार्टीचे राजा कृष्णमूर्ति हे हेली यांच्या बाजुने उभे ठाकल्याने ट्रम्प पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top