निमसोडच्या सिद्धनाथ यात्रेत रथावर ५० लाखांची देणगी जमा

सातारा – यंदा खटाव तालुक्यातील निमसोड येथील ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धनाथ देवाचा वार्षिक रथोत्सव मोठ्या जल्लोषात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला.या यात्रेतील रथावर तब्बल ५० लाख ३२ हजार २८० रोख देणगी जमा झाल्याचे दिसून आले.गेल्या वर्षीपेक्षा ही दान रक्कम २,६६,३४२ रुपयांनी जास्त आहे.

सकाळी श्री सिद्धनाथांची विधीवत षोडशोपचार पूजाविधी व महाआरती झाल्यानंतर मानकऱ्यांच्या हस्ते श्रींची रथामध्ये स्थापना करण्यात आली. त्यानंतर गावातील घाडगे, मोरे व देशमुख या प्रमुख तीन भावकींच्या प्रतिनिधींसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत रथाचे पूजन करण्यात आले.यावेळी श्रीफळ वाढवून गुलाल- खोबऱ्याची उधळण करण्यात आली. सिद्धना्थाच्या नावानं चांगभलं–नाथबाबाच्या नावानं चांगभलं चा गजर करीत रथोत्सव मिरवणूकीस प्रारंभ करण्यात आला.

यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची व यात्रेकरूंची गर्दी दिसून आली.फुलांनी सजवलेल्या तीन मजली लाकडी रथामधून श्री सिध्दनाथ रथोत्सव मिरवणुकीस प्रारंभ झाला. रथापुढे गजी, लेझिम, ढोल-ताशा, बॅंड पथकासह अश्वारुढ मानकरी,सेवेकरी भाविकांच्या उपस्थितीमुळे रथ मिरवणूकीची शोभा वाढली होती.यंदा कुस्तीच्या फडासोबत नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा आणि बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्या होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top