निर्मला सीतारामन यांना फोर्ब्स यादीत ३२ वे स्थान

वॉशिंग्टन :

अमेरिकन बिझनेस मॅगझि अर्थात फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या वार्षिक यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुन्हा एकदा जगातील १०० शक्तिशाली महिलांमध्ये स्थान मिळवले आहे. या यादीत त्या ३२ व्या स्थानी आहेत. या यादीमध्ये राजकारण आणि धोरण, व्यवसाय, अर्थशास्त्र, मीडिया आणि मनोरंजन अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या जगभरातील प्रभावशाली महिलांचा समावेश आहे. फोर्ब्सने ६४ वर्षीय निर्मला सीतारामन यांना भारतातील राजकारण आणि धोरणांमधील योगदानासाठी या यादीत स्थान दिले आहे. निर्मला सीतारामन यांच्याकडे २०१९ मध्ये भारताच्या अर्थमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यासोबतच त्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रीही आहेत. राजकारणातील कारकिर्दीपूर्वी, सीतारामन यांनी यूके स्थित असोसिएशन ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिय आणि बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या म्हणूनही त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top