नीता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये ‘मम्मा मिया’चा सांगितिक खेळ

मुंबई

मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलमधील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरने पुन्हा एकदा नवीन कलाविष्कार प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. लंडनच्या वेस्ट एंडमधील स्मॅश हिट संगीत ‘मम्मा मिया’ या कार्यक्रमाचे उद्घाटन ३० नोव्हेंबरला करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे प्रयोग ७ जानेवारी २०२४ पर्यंत सादर होणार आहेत.

मम्मा मिया हे म्युझिकल शो जगभर लोकप्रिय आहे. या शोमध्ये गाण्यांमधून कथानक सादर केले जाते. यात सिंगल मदर डोना आणि तिची लवकरच लग्न होणारी मुलगी सोफी यांची कथा सांगण्यात आहे. सोफी तिच्या कधीही न भेटलेल्या वडिलांच्या शोधात असते. यावेळी ती ३ वेगवेगळ्या पुरुषांना आपल्या आईसमोर उभे करते, ज्यांचे तिच्या आईशी संबंध आलेले असतात. ही हृदयस्पर्शी कथा प्रसिद्ध स्वीडिश बँड एबीबीएशी संगीतावर सादर केली आहे. या शोच्या उद्घाटना दिवशी सांस्कृतिक केंद्राच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या, नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये, जगातील सर्वोत्तम शो भारतात आणण्याच्या आमच्या उद्दिष्टानुसार, पहिला वेस्ट एंड शो सादर करण्याचा आम्हाला सन्मान मिळाला आहे. प्रेम, नाती आणि संगीत यांची गुंफण असलेल्या या कथेला वैश्विक मूल्य आहे. या कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी आपण यावे आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top