Home / News / नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळून ५ ठार

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळून ५ ठार

काठमांडूने – पाळमधील नुवाकोट जिल्ह्यात आज हेलिकॉप्टर कोसळून पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर काठमांडूहून स्याफ्रुबेन्सीकडे जात असताना शिवपुरी...

By: E-Paper Navakal

काठमांडूने – पाळमधील नुवाकोट जिल्ह्यात आज हेलिकॉप्टर कोसळून पायलटसह पाच जणांचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर काठमांडूहून स्याफ्रुबेन्सीकडे जात असताना शिवपुरी भागात आज दुपारी १.५७ वाजता दुर्घटनाग्रस्त झाले. सीनियर पायलट अरुण मल्ला यांच्या नेतृत्वाखालील हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांतच ग्राउंड स्टाफशी संपर्क तुटला. पायलटसह चीनचे चार नागरिक असे एकूण हेलिकॉप्टरमध्ये पाच जण होते. चीनचे प्रवासी रसुवा येथे जात होते, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर हे एअर डायनॅस्टी कंपनीचे आहे.

Web Title:
संबंधित बातम्या