नेरळमध्ये मृत मोराचा शासकीय इतमामात अंत्यविधी

कर्जत – नेरळ येथील हुतात्मा चौक परिसरात फॉरेस्ट टेकडी आणि मोरोशी भागात मोठ्या प्रमाणात मोरांचा संचार असतो. त्यातील एका मोराचा वीजवाहिनीला धडक बसल्याने मृत्यू झाला. मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याने त्याच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.

नेरळ गावात मोर हे मानवी वस्तीत अनेकदा फिरताना दिसतात. टेप आळी, मोडक नगर आणि चिंच आळी भागात मोर बागडताना दिसत असतात. मानवी वस्तीतही मोरांचा वावर सुरक्षीत असल्याने असंख्य मोर अनेक वर्षे वस्ती करून आहेत. १६ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास फॉरेस्ट टेकडी येथे वाहणार्‍या कंपनीच्या वीजवाहक तारांना एक मोर धडकून मृत्युमुखी पडला. नेरळ ग्रामपंचायत कर्मचारी बाळू लिये आणि नेरळ माथेरान टॅक्सी संघटनेचे कार्यकर्ते किशोर भोईर यांनी त्याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचा मृतदेह तिरंग्यात गुंडाळून त्याचे दफन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top