नेवाडा विद्यापीठात गोळीबारतिघांचा मृत्यू ! १ गंभीर जखमी

वॉशिंग्टन

अमेरिकेतील लास वेगस येथील नेवाडा विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्ये काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञाताने गोळीबार केला. या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. येथे पोहोचताच पोलिसांना गोळीबार करणारा आरोपी देखील मृतावस्थेत आढळला. या आरोपीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली की कोणी त्याची हत्या केली, हे स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अद्याप मृतांची ओळख पटली नाही.

गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून सुरक्षितपणे बाहेर काढले. नेवाडा विद्यापीठाचे प्राध्यापक व्हिन्सेंट पेरेझ यांनी सांगितले की, विद्यापीठ कॅम्पसमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला. किमान ७ ते ८ वेळा अज्ञाताने गोळीबार केला. पोलिसांनी परिसरातील लोकांना विद्यापीठ परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. व्हाईट हाऊसने सांगितले की, आम्ही लास वेगासमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या घटनेची गंभीर दखल घेतली जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top