Home / News / नैसर्गिक आपत्तीचा इशारा देणाऱ्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

नैसर्गिक आपत्तीचा इशारा देणाऱ्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोटा -नैसर्गिक आपत्ती व पर्यावरणातील बदलांचा इशारा देण्याची क्षमता असलेल्या ईओएस ०८ या उपग्रहाचे आज श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून...

By: E-Paper Navakal

श्रीहरीकोटा -नैसर्गिक आपत्ती व पर्यावरणातील बदलांचा इशारा देण्याची क्षमता असलेल्या ईओएस ०८ या उपग्रहाचे आज श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने देशातील सर्वात लहान रॉकेटचा वापर केला. हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर ४७५ किमी अंतरावर स्थापित केला जाणार आहे. हा उपग्रह एक वर्ष काम करणार असून या काळात तो पर्यावरण व नैसर्गिक आपत्तीबाबतची अचूक माहिती देणार आहे. या उपग्रहावरील यंत्रणा समुद्राच्या पृष्ठभागावरील वाऱ्यांचे विश्लेषण करणार असून वातावरणातील आर्द्रतेचाही अभ्यास करणार आहे. त्यामुळे संभाव्य पुराची कल्पना येऊ शकेल. गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेल्या अतीनिल किरणांचा अभ्यासही हा उपग्रह करणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या