Home / News / नोकरदार महिलांना मातृत्व रजेचा अधिकार! राजस्थान उच्चं न्यायालयाचा निकाल

नोकरदार महिलांना मातृत्व रजेचा अधिकार! राजस्थान उच्चं न्यायालयाचा निकाल

जयपूर – कोणत्याही अस्थापनात काम करणाऱ्या नोकरदार महिलांना १८० दिवस मातृत्व रजा मिळण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल राजस्थान उच्च...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

जयपूर – कोणत्याही अस्थापनात काम करणाऱ्या नोकरदार महिलांना १८० दिवस मातृत्व रजा मिळण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेला आहे.मॅटर्निटी बेनिफिट २०१७ मध्ये केंद्राने आणि राज्य सरकारने आवश्यक ते बदल करावेत, असे निर्देशही दिले आहेत.

राजस्थान राज्य रस्ते वाहतूक मंडळात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला ९० दिवसांची मातृत्व रजा देण्यात आली. या महिलेने या विरोधात न्यायालयात दाद मागितली होती.न्या. अनुप कुमार धंड यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली. राजस्थान राज्य रस्ते वाहतूक मंडळाने त्यांच्या नियमानुसार ९० दिवसांची रजा देता येते असा बचाव मांडला होता.
पण न्यायमूर्तींनी हा नियम भेदभाव करणारा आहे, असे सांगत याचिकाकर्त्या महिलेला १८० दिवस रजा मिळण्याचा अधिकार असल्याचा निकाल दिला. तसेच या महिलेला आता या रजांची गरज राहिलेली नसल्याने ९० दिवसांचे वेतन देण्यात यावे असे निर्देश दिले आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या