न्यायालयाच्या परवानगीशिवाय राम रहीमला पेरोल देवू नये

चंडीगड – हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम याला सतत पेरोल देण्याच्या प्रकरणाची, पंजाब – हरयाणा उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे राम रहीमला पेरोल देताना न्यायालयाची परवानगी घ्या असे सक्त आदेश न्यायालयाने प्रशासनाला दिले आहेत.

राम – रहीमला २ हत्या प्रकरणात जन्मठेपेची तर बलात्कार प्रकरणात २० वर्षांची शिक्षा झाली आहे. पण असे असताना त्याची तीन ते चार वेळा पेरोलवर सुटका झाली. सध्या तो ५० दिवसांच्या पेरोलवर आहे. दरम्यान राम रहीमला सतत पेरोल दिला जात असल्याच्या विरोधात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने पंजाब – हरयाणा उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी होऊन
न्यायालयाने तुरुंग प्रशासनाची कडक शब्दात कान उघडणी केली व यापुढे त्याला पेरोल देताना न्यायालयाची परवानगी घ्या असे सख्त आदेश दिले आहेत .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top