न्यूजक्लिकवरील कारवाईनंतर सुप्रीम कोर्टाची पोलिसांना नोटीस

नवी दिल्ली- न्यूजक्लिकचे संस्थापक आणि संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने याप्रकरणी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला होणार आहे.

प्रबीर आणि अमित यांनी 16 ऑक्टोबरला त्यांच्या अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याआधी 10 ऑक्टोबरला दिल्ली हायकोर्टाने दोघांनाही 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ही कोठडी उद्या संपत आहे. त्यांच्यावर चीनशी संबंधित कंपन्या आणि संस्थांकडून निधी घेऊन चिनी प्रचाराचा प्रसार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

सीबीआयसह पाच तपास यंत्रणा न्यूजक्लिकच्या विरोधात तपास करत आहेत. प्रथम दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एफआयआर नोंदवला होता. त्याआधी दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभाग या प्रकरणाशी संबंधित वेगवेगळ्या प्रकरणांची चौकशी करत आहे. सीबीआयने न्यूजक्लिकविरुद्ध फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top