न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर गुलाबी साडी गाणे झळकले

वॉशिंग्टन

मराठमोळा गायक संजू राठोड यांनी गायलेले गुलाबी साडी हे गाणे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहे.गुलाबी साडी हे गाणे सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. देशभरातील अनेकांनी या गाण्यावर व्हिडीओदेखील बनवले आहेत. मात्र आता हे गाणे अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर’वर झळकले. न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर पहिल्यांदाच मराठी गाणे झळकले आहे. याबाबत संजू राठोड यांनी सांगितले की, अल्पावधीतच एवढे यश मिळाले, यासाठी मी स्वत:ला फार भाग्यवान समजतो. आतापर्यंत माझ्या गाण्यांनी ७० दशलक्ष व्ह्यूजचा टप्पा पार केला, हाच आनंद माझ्यासाठी फार मोठा होता. त्यातच आता न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर माझे गाणे झळकले. यामुळे माझ्या आनंदात आणखी भर पडली आहे. माझा आनंद शब्दांत व्यक्त करणे फार कठीण आहे. हे सगळे शक्य झाले ते माझ्या चाहत्यांमुळे आणि त्यांनी माझ्या गाण्यांना दिलेल्या प्रतिसादामुळे. त्यांच्या प्रेमामुळे मला आणखी प्रेरणा मिळाली आहे. चाहत्यांचे ऋण मी कधीही विसरणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top