पंकजा मुंडे उद्या उमेदवारी अर्ज भरणार

बीड :

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली. पंकजा २४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यासोबतच बीडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन देखील करणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले आहे. २४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता
उमेदवारी अर्ज दाखल केल्यांनतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचार रॅलीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर पंकजा अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराज्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचार रॅलीचे सभेत रूपांतर होणार आहे. बीडमधील माने कॉम्प्लेक्समध्ये पंकजा यांची जाहीर सभा होणार आहे. बीडमध्ये पंकजा यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे निवडणूक लढवत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top