Home / News / पंचगंगेच्या पुरामुळे यंदा होड्यांच्या शर्यत स्थगित

पंचगंगेच्या पुरामुळे यंदा होड्यांच्या शर्यत स्थगित

कोल्हापूर- इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदुर उत्सव मंडळाच्यावतीने दरवर्षी क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी पंचगंगा नदीपात्रात होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात...

By: E-Paper Navakal

कोल्हापूर- इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदुर उत्सव मंडळाच्यावतीने दरवर्षी क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी पंचगंगा नदीपात्रात होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी होणार्‍या या होड्यांच्या शर्यती पंचगंगेच्या महापुरामुळे स्थगित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेची पुढील लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी दिली.

बाळासाहेब कलागते यांनी सांगितले की, सालाबादाप्रमाणे यंदाही क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु पंचगंगा नदीला आलेल्या महापूराचे पाणी अद्यापही ओसरलेले नाही. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ६७ फुटाच्यावर आहे.त्यामुळे यंदा होणाऱ्या शर्यती स्थगित करण्यात आल्या आहेत.होड्यांच्या शर्यतीची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

Web Title:
संबंधित बातम्या