पंतप्रधान मोदींची २८ एप्रिलला कोल्हापुरात जाहीर सभा

कोल्हापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २८ एप्रिलला कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. कोल्हापुरातील तपोवन मैदानात या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र व राज्य सरकारमधील इतर मंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत.
याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी माहिती दिली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी २८ एप्रिलला सभा घेणार आहेत. कोल्हापुरात संजय मंडलिक यांच्या विरोधात महाविकास आघाडीने शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने यांच्याविरोधात महाविकास आघाडीने माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top