पंतप्रधान मोदींच्या कोल्हापूरमधील सभेच्या विक्रमी गर्दीचा फोटो खोटा

कोल्हापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी कोल्हापूरमध्ये महाविजय संकल्प सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान मोदींनी जवळपास अर्धा तास भाषण केले. या सभेला विक्रमी गर्दी झाल्याचा दावा करणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या फोटोची सत्यता तपासल्यानंतर हा फोटो नायजेरियाचा असल्याचे उघड झाले. केनियामधील एका वृत्त संस्थेच्या वेबसाईटवर या फोटोचा संदर्भ सापडतो. हा फोटो २००० मधील असल्याचे यात म्हटले आहे.

कोल्हापूरमधील महाविजय संकल्प सभेबाबत भाजपा समर्थकांनी एक्सवर पोस्ट केल्या आहेत. एका भाजपा समर्थकाने आपल्या अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला असून त्याने म्हटले आहे की, “भावा हे कोल्हापूर आहे, जय भवानी जय शिवाजी, तमाम कोल्हापूरकरांना माझा नमस्कार, नरेंद्र मोदी गर्दीचे सारे रेकॉर्ड तोडले कोल्हापूरकरांनी. तर आणखी एका भाजपा समर्थकाने ‘कोल्हापूरच्या रॅलीला विराट गर्दी,’ असे म्हणत पोस्ट केली आहे. मात्र, या सर्व पोस्टमधील फोटोची सत्यता तपासल्यानंतर तो नायजेरियाचा असल्याचे उघड झाले. “ख्रिश्चन धर्मासाठी काम करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित रॅलीमधील हा फोटो आहे. या रॅलीत जर्मन प्रचारक राईनहार्ड बोंके यांनी संबोधित केले होते. राईनहार्ड यांनी पाच दिवस नायजेरियातील लागोस येथे ही रॅली घेतली होती. या रॅलीनंतर आफ्रिकेतील सर्वात प्रसिद्ध धर्मगुरू म्हणून ते ओळखले जात होते,” असे केनियामधील वृत्त संस्थेने म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top