पंतप्रधान १४ मे रोजी उमेदवारी अर्ज भरणार

वाराणसी
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १४ मे रोजी वाराणशीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वाराणसी इथे लोकसभा निवडणूकीच्या ७ व्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ मे रोजी वाराणसीत एक भव्य रोड शोदेखील करणार असून यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. यावेळी भाजपा नेते व इतर सहयोगी पक्षाचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. वाराणशीमध्ये त्यांचा मुकाबला काँग्रेस नेते अजय राज यांच्या बरोबर होणार असून या मतदार संघात शाम रंगीला आणि बहुजन समाजवादी पार्टीचे अथार अली लारी हेही निवडणूक लढवत आहेत. मोदी वाराणशीमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असून २०१४ च्या पूर्वी या मतदारसंघातून भाजपाचे मुरली मनोहर जोशी यांनी निवडणूक लढवली होती. २०१९ मध्ये मोदी यांनी काँग्रेसचे अजय राय यांचा मोदींनी ६ लाख ७४ हजार ६६४ मतांनी पराभव केला होता. या वेळीही त्यांचा विजय निश्चित असला तरी त्यांचे मताधिक्य वाढते की घटते, हे पाहावे लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top