पतंजलीला आणखी फायदा! भारतीय लष्कराशी करार

बरेली – योग,आयुर्वेद चिकित्सा आणि आरोग्य यासह विविध विषयांवर लक्ष केंद्रित करणारा सामंजस्य करार भारतीय लष्कर आणि पतंजली योगपीठ यांच्यात येथील लष्कराच्या मुख्यालयात नुकताच झाला. पतंजलीचे प्रमुख योग गुरू रामदेवबाबा यांनी योग प्रशिक्षणासह हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यापासून केंद्र सरकार पतंजलीवर मेहरबान आहे . त्यामुळे पतंजलीच्या आधीपासून आयुर्वेद औषधी बनविणाऱ्या कंपन्यांना मागे टाकून पतंजलीने लष्कराशी करार करून फायदा मिळवला आहे .
यावेळी योग,आयुर्वेदिक औषध आणि सैनिकांच्या भल्यासाठी आरोग्यसेवा या क्षेत्रात सहकार्य करण्यावर एकमत झाले,असे पतंजली योगपीठाने शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.पतंजली योगपीठाचे सरचिटणीस आचार्य बाळकृष्ण, सी सेंट्रल कमांडमधील जीओसीचे
लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि,सीओसी नॉर्थचे लेफ्टनंट जनरल आर.सी.तिवारी,स्वतंत्र माउंटन ब्रिगेड गटाचे ब्रिगेडियर अमन आनंद, कमांडर, मुख्यालय ९ आणि मेजर विवेक जेकब आदि उपस्थित होते. यावेळी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना पतंजली आणि तिच्या संलग्न संस्थांनी पतंजली येथे विविध सेवांसाठी निवृत्त लष्करी कर्मचार्‍यांची प्राधान्याने नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top