Home / News / परतीच्या पावसाची उसंत रब्बी हंगामाची पेरणी सुरू

परतीच्या पावसाची उसंत रब्बी हंगामाची पेरणी सुरू

इचलकरंजी- मागील दोन दिवसांपासून तालुक्यातील अनेक भागात पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे.त्यामुळे शेतकरीवर्ग रब्बीच्या हंगामातील पेरणीकडे वळलेला दिसत आहे.रब्बी हंगामातील ज्वारी,हरभरा आदी पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

पावसाने उसंत दिल्यामुळे सध्या सर्वत्र पेरणीचे चित्र दिसत आहे. यंदा बैल आणि ट्रॅक्टर चालकांनी आपल्या भाड्यात वाढ केली आहे. सध्या एकरी २०० ते ३०० रुपये भाडे आहे. दरवाढ झाली असली तरी पेरणीची वेळ निघून जाऊ नये म्हणून त्या वाढीव दरातही पेरणी उरकण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे.परतीच्या पावसामुळे जमिनीत निर्माण झालेला ओलावा रब्बीच्या पिकाला पोषक ठरण्याची शक्यता आहे.