परदेशवारी सुरू असतानाच उष्णतेमुळे हापूसवर संकट

सिंधुदुर्ग- कोकणातील ‘हापूस’ आंब्याची परदेशवारी सुरू असतानाच वातावरणातील उष्णता प्रचंड वाढली आहे. त्यातच अवकाळी पावसानेही हजेरी लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे उष्णता आणि अवकाळीमुळे कोकणचा ‘हापूस’ धोक्यात आला आहे.

यंदाच्या पहिल्याच हंगामात २८ टन हापूस आंबा थेट अमेरिकेत निर्यात झाला आहे. त्यामध्ये ३० टक्के हापूस आंबा हा एकट्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे.ही परदेशवारी सुरू असताना सध्या कोकणात उन्हाचा तडाखा वाढला आहे. या तापमानवाढीमुळे फळगळती आणि आंबा करपण्याचे प्रमाणही वाढले आहे.तसेच जमिनीवर गळून पडलेल्या फळामुळे फळमाशीचा उपद्रव वाढू लागला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top