परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

मुंबई

परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने दिवाळीत मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी शासनाने १२ कोटी ८८ लाख रूपये मंजूर केले आहेत. इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने याबाबत नुकताच शासन निर्णय जारी केला आहे. शासनाने परदेशातील शिष्यवृत्तीसाठी २०२३-२४ मध्ये ५० ओबीसी विद्यार्थ्यांची निवड केली आहे. यामध्ये या वर्षातीस बॅचमधील ३२ ततर मागील बॅचमधील २ विद्यार्थ्यांना १२ कोटी ८८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. ओबीसी प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी या शिष्यवृत्तीचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला आहे. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी परदेशातील नामांकित शिक्षण विद्यापीठातील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top