परभणीच्या बाजारपेठेत दोन दुकानांना आग

परभणी

परभणीमधील गंगाखेड शहरातील मुख्य बाजारपेठेतील स्त्यावर असलेल्या शेटे कॉम्प्लेक्स मधील मयूर ड्रायक्लीनर्स व बालाजी फर्निचर ही दोन्ही दुकाने आगीत जळून खाक झाली. आज पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास ह्या दुकानांना आग लागली. आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली. या घटनेत दुकान मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पहाटे साफसफाई कामगारांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ दुकान मालकांना संपर्क केला. तसेच अग्निशन दलाला या घटनेची माहिती दिली. दुकानात कापड व फर्निचरचे साहित्‍य असल्‍याने आगीचा धोका अधिक होता. माहिती मिळताच अग्निशन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी २ ते ३ तासांनी या आगीवर नियंंत्रण मिळवले. या आगीत दुकानातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top