परभणीत ट्रॅक्टरची भाविकांच्या गाडीला धडक! ३ जणांचा मृत्यू

परभणी

परभणीच्या यशवाडी या गावातील मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गाडीला एका ट्रॅक्टरने धडक दिली. काल रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले. अमोल मारुती सोळंके, अण्णासाहेब हरिभाऊ सोळंके, दिगंबर भिकाजी कदम अशी मृतांची नावे आहेत. कृष्णा सखाराम सोळंके, उमेश भारत सोळंके, संतोष कुंडलिक पांचाळ, अविनाश चंदू पाटील सोळंके, दशरथ सुदामराव, किशोर सोळंके हे ६ जण जखमी झाले आहेत.

जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जालना जिल्ह्यातील परतुर येथील ब्राह्मणवाडी या गावातील एकूण ९ जण परभणीच्या यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर परतत असताना पाथरी तालुक्यातील वडीपाटीजवळ ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर आणि गाडीची मध्यरात्री धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी जेसेबीच्या मदतीने दोन्ही वाहनांना रस्त्यावरून बाजूला केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top