परळच्या कामगार मैदानात आज रामरथ अवतरणार

मुंबई –
पद्मविभूषण स्वामी श्री रामभद्राचार्य तुलसीपीठाधीश्वर (चित्रकूट)हनुमान सेना यांच्या वतीने उद्या सोमवार १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत कामगार मैदान, परळ (पूर्व) येथे रामरथ अवतरणार असून रामभक्तांना अयोध्येतील रामलल्लावर अभिषेक साठी अक्षता समर्पण करण्याची पर्वणी मिळणार आहे. त्यामुळे या पर्वणीचा जास्तीत जास्त रामभक्तांनी आवर्जून लाभ घेण्याचे आवाहन संयोजक श्री नाना आंबोले यांनी केले आहे. अयोध्येतील श्री राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या करोडो रामभक्तांचे स्वप्न आता साकारणार आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने भारतात राममंदिर रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top