चिपळूण – मुंबई-गोवामहामार्गावरील परशुराम घाटामधील संरक्षक भिंत पुन्हा कोसळली. ही घटना आज पहाटे घडली. सुदैवाने या महामार्गावरील एका लेनची वाहतूक बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे घाटातील ठेकेदार कंपनीच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे. संरक्षक भिंत सातत्याने कोसळत असल्यामुळे घाटाखाली राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भिंतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
