पवार साहेबांएवढे प्रेम कोणीही मिळवू शकत नाहीत! रोहित पवारांचे वक्तव्य

बारामती
शरद पवारांएवढे प्रेम कोणीही मिळवू शकत नाहीत असे विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण नेते रोहित पवार यांनी आज बारामतीत केले. ते आज बारामती मतदारसंघातील पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत बोलत होते.
ते म्हणाले की, शरद पवार यांचे कुटुंब म्हणजे केवळ पवार आडनाव लावणारे नव्हेत तर या ठिकाणी उपस्थित असलेला हा प्रचंड जनसमुदाय, हाच पवार साहेबांचा परिवार आहे. पवार साहेबांचे ६० वर्षांचे कष्ट आम्ही विसरलेलो नाही व विसरणार नाही. तुम्ही केवळ लढ म्हणा. हा सारा भाग तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. शरद पवारांना जे लोकांचे प्रेम मिळाले ते कोण कसे नेणार, असा सवालही त्यानी उपस्थित केला. यावेळी त्यांनी सांगितले की, शरद पवारांनी सत्ता राखली त्या माध्यमातून अनेकांना पदे दिली. त्यामुळे ते आपापल्या मतदारसंघात विकास करू शकले. त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी एकदा तरी हे जाहिररीत्या कबुल करावे. एकेकाळी ताईंच्या विरोधात कोणी काही बोलले तर दादा त्यावर पलटवार करायचे मग आता असे काय झाले याचे स्पष्टीकरण दादांनी द्यावे. या विधानांचे व्हिडिओ त्यांनी यावेळी दाखवले. लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे आता भाजपाबरोबर गेले आहेत, असे सांगत त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही टोला लगावला. शरद पवारांविषयी भाजपाच्या नेत्यांनी जी विधाने केली आहेत. ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला आवडलेली नाहीत. त्याचे उत्तर ही जनता मतपत्रिकेद्वारे देईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top