पश्चिम बंगालच्या सात गावांमध्ये सोमवारपर्यंत जमावबंदी लागू

कोलकाता- पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगना जिल्ह्यातील संदेशखळीसह सात ग्रामपंचायती आणि त्यांच्या सभोवतालच्या ५०० मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पश्चिम बंगालच्या अशांत संदेशखळी भागाची स्वतःहून दखल घेतली होती. कारवाईचा अहवाल तीन दिवसांत सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ उद्या म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथील संदेशखळीला भेट देणार आहे. संदेशखळी प्रकरणावर बारासत रेंजचे डीआयजी सुमित कुमार म्हणाले, ‘सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. कालपासून १९फेब्रुवारीपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले होते.जनता आम्हाला पाठिंबा देत आहे आणि आम्ही आशा करतो की लवकरच सर्व काही ठीक होईल.राज्य सरकारला परिसरात शांतता हवी आहे,त्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता च्या कलम १४४ अंतर्गत सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रमुख सुकांत मजुमदार यांनी म्हटले आहे की,’मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पोलिस घाबरले आहेत.त्यांना खरी घटना समोर येऊ द्यायची नाही. त्यामुळेच या भागात सातत्याने कलम १४४ लागू करण्यात येत आहे. कोणताही नेता किंवा सामाजिक संघटना तेथे जाऊ नये म्हणून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top