पश्चिम रेल्वेवरील दादर लोकलमध्ये तांत्रित बिघाड

मुंबई

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आज सकाळी काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. दादर रेल्वे स्थानकात रेल्वेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. जलद मार्गावरील गाड्यांवर या बिघाडामुळे विशेष परिणाम झाला. या बिघाडामुळे चर्चगेटकडे जाणारी रेल्वे उशीराने धावत होती. ऐन गर्दीच्या वेळी लोकलसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. अनेक प्रवासी कंटाळून रुळावरून चालत गेले. अनेक लोकल गाड्या बराच वेळ रेल्वे रुळावर थांबल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी उशीर झाला. याबाबत माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरळित झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top