पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई

पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रुळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर वाडीबंदर व पनवेलजवळ रिमॉडलिंगच्या कामासाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर उद्या सकाळी १०.३५ ते सायंकाळी ३.३५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येणार असून, काही लोकल उशिराने धावण्याची शक्यता आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top