पहिली कोव्हिड लस तयार करणाऱ्या चिनी शास्त्रज्ञाची संसदेतून हकालपट्टी

बिजिंग -२०२० साली कोरोना महामारीचा प्रकोप अगदी टीपेला पोहोचला असताना पहिली कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणारे चिनी शास्त्रज्ञ यांग झियाओमिंग यांच्यावर शिस्तभंग आणि कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून त्यांची चीनच्या संसदेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
झियाओमिंग हे चायना नॅशनल फार्मास्युटिकल ग्रूपची कोरोना लस निर्मिती करणाऱ्या उपकंपनी चायना नॅशनल बायोटेक ग्रूपचे (सीएनबीजी) अध्यक्ष आहेत. ते चिनी संसद नॅशनल पिपल्स काँग्रेसचेही सदस्य होते.
झियाओमिंग यांची सध्या यांची सध्या पक्षाच्या शिस्तपालन समितीकडून चौकशी केली जात आहे. ६२ वर्षीय झियाओमिंग चिनमधील नामवंत शास्त्रज्ञ आहेत. सरकारी मालकीच्या सिनोफार्म या कंपनीची उपकंपनी असलेल्या सीएनबीजीच्या शास्त्रज्ञांच्या पथकाचे त्यांनी नेतृत्व केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या पथकाने बीबीआयबीपी-कॉर व्ही ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली होती. प्रत्यक्ष वापर करण्याची परवानगी मिळालेली ती पहिली करोना लस ठरली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top