पाईपलाईन गळतीमुळे जतमध्ये तीव्र पाणीटंचाई

सांगली- सुमारे ५० हजार लोकसंख्या असलेल्या जत शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जुनी झाली आहे. तसेच या पाईपलाईनला काही भागात महिनाभरापासून गळती सुरू असल्याने जत शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. शहरातील अनेक भागात तर ८ ते १० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे.

शहरातील विद्युत कॉलनीत पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागली आहे. गेल्या महिन्यापासून ही गळती सुरू आहे. यातून दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. मात्र नगरपरिषद त्याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. त्यातच आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पाठपुरावा करून ७८ कोटींची नवी पाणीपुरवठा योजना सरकारकडून मंजूर करून घेतली आहे. पण या योजनेला अजून तांत्रिक मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान, पाईपलाईन गळती सुरू असल्याने महिलांना अक्षरशः खड्ड्यातून पाणी भरावे लागत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top