पाकिस्तानच्या उपपंतप्रधानपदी परराष्ट्रमंत्री दार यांची नियुक्ती

इस्लामाबाद – पाकिस्तानातील शाहबाज शरीफ सरकारने परराष्ट्र व्यवहार मंत्री इसाक दार यांची देशाच्या उपपंतप्रधान पदावर नियुक्ती केली आहे.दार हे काश्‍मिरी वंशाचे असून त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

याबाबत सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती आसिफ अलि झरदारी यांनी दार यांची उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी शाहबाज शरीफ सौदी अरब येथे गेले असतानाच दार यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे.मार्च महिन्यातच पाकिस्तानातील नव्या मंत्रिमंडळात १९ जणांचा समावेश करण्यात आला होता. तेव्हापासून दार या मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत.आर्थिक अडचणीत सापडलेला पाकिस्तान जगभरात मदतीसाठी प्रयत्न करत असताना दार यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दार हे पाकिस्तान मुस्लिम लिग- नवाज पक्षाचे वरिष्ठ नेते असून माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. यापूर्वी चार वेळा त्यांनी पाकिस्तानचे अर्थ खाते सांभाळले आहे. ते मूळचे काश्‍मीरचे असून पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top