पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी पुन्हा शहाबाज शरीफ

इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शहाबाज शरीफ यांची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने पीएमएल – एन आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी यांच्यात युतीचे सरकार स्थापण्यावर सहमती झाली होती. त्यानंतर आज पंतप्रधानपदासाठी संसद सदस्यांनी मतदान केले. या निवडणुकीत शहाबाज शरीफ यांना २०१ मते मिळाली. त्यांचे विरोधक इम्रान खान पक्षाचे ओमर अयुब खान यांना केवळ ९२ मते मिळाली. त्यानंतर शहाबाझ शरीफ यांची निवड झाली.
शाहबाज हे पाकिस्तानचे २४ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. निवडणुकीपूर्वीही शहाबाझ शरीफ यांनी पंतप्रधानपद भूषवले होते. शहा त्यांच्या आधी त्यांचे बंधू नवाझ शरीफ यांनी तीनदा पाकिस्तानचे पंतप्रधानपद भूषवले होते. यंदाची पाकिस्तानातील निवडणूक अतिशय चुरशीची झाली. या निवडणूकीत इम्रान खान यांच्या पक्षावर घालण्यात आलेली अघोषित बंदी, त्यांची धरपकड, त्यानंतर मतदानात झालेली हिंसा, त्यानंतर मतमोजणीत झालेला गोंधळ या साऱ्या पार्श्वभूमीवर शहाबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top