पाकिस्तानच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यात इराणमध्ये ७ ठार

तेहरान :

पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणच्या आग्नेय सीमेजवळ किमान ७ लोक ठार झाल्याचे वृत्त इराणच्या स्थानिक माध्यमांनी दिले.
इराणने पाकिस्तानमधील बलुचिस्तानातील ग्रीन माऊंटन भागातील जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळावर सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने इराणच्या हद्दीतील दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. बलुचिस्तान प्रांतात इराणने केलेल्या हल्ल्याच्या एका दिवसानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल ही कारवाई केली.

पाकिस्तानाने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात ७ ठार झाले असून त्यात ४ मुले आणि ३ महिलांचा समावेश आहे, अशी माहिती एका स्थानिक अधिकाऱ्याने इराणच्या सरकारी टेलिव्हिजनशी बोलताना सांगितले. पाकिस्तान सरकारने या हल्ल्याला त्याच्या सार्वभौमत्वाचे आणि हवाई क्षेत्राचे उल्लघन असल्याचे म्हटले आहे. तसेच इराणला या हल्ल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही पाकिस्तानने दिला होता. त्यानंतर आज पाकिस्तानने इराणच्या आग्नेय सीमेजवळ एअरस्ट्राइक केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top