पाकिस्तानमध्ये योगाला सुरुवात! प्रशासनाकडून मोफत वर्ग सुरू

इस्लामाबाद

जगभरात लोकप्रियता मिळवल्यानंतर भारताचा प्राचीन, शारीरिक आणि मानसिक व्यायाम ‘योग’ आता पाकिस्तानातही अधिकृतपणे सुरू झाला आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या कॅपिटल डेव्हलपमेंट अथॉरिटीने (सीडीए) त्यांच्या अधिकृत फेसबुकवर मोफत योग वर्ग सुरू करण्याची घोषणा केली आहे. इस्लामाबाद मधील सर्वात मोठ्या ‘एफ ९’ उद्यानात हे मोफत योग वर्ग भरणार आहेत.

निरोगी आरोग्याच्या दिशेने प्रवास सुरू करण्यासाठी या योग वर्गात बरेच लोक सामील झाल्याचे सीडीएने म्हटले आहे. सीडीएच्या या निर्णयाचे पाकिस्तानातील अनेक नागरिकांनी कौतुक केले आहे. अनेक लोक आधीपासूनच योगवर्गात सहभागी झाले असून त्याची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सीडीएच्या या उपक्रमाचे कौतुक करताना, एका नेटकऱ्याने हा एक चांगला उपक्रम असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, योगाला २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता दिली. त्यानंतर संघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केला. भारताने हा प्रस्ताव ठेवला होता, ज्याला विक्रमी १७५ देशांचा पाठिंबा मिळाला होता. योग भारताशी निगडीत आहे तो पाकिस्तानात इतका लोकप्रिय नव्हता. मात्र आता पाकिस्तानमध्येही अनेक खाजगी संस्था योग शिकवतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top