पाकिस्तानला नाणेनिधीकडून ७०० दशलक्ष डॉलर्सची मदत

इस्लामाबाद- पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागलेली असून तेथील जनता महागाईने अक्षरशः होरपळून निघाली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पाकिस्तान विविध देश आणि आंतरराष्ट्रीय बँका तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्जाची मागणी करत होता.पाकिस्तानच्या या प्रयत्नांना यश आले असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आता ७०० दशलक्ष डॉलर्सचा पहिला हप्ता पाकिस्तानला देणार आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने स्टँडबाय अरेंजमेन्टअंतर्गत पाकिस्तानला ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्याचा कर्मचारी स्तरावरचा करार केला आहे.११ जानेवारी रोजी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होणार असून यावेळी या पाकिस्तानच्या करारातील आर्थिक मदतीचा ७०० दशलक्ष डॉलर्सचा पुढील हप्ता मंजूर केला जाणार आहे.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संचालक मंडळाच्या जानेवारी महिन्यात ८,१० आणि ११ रोजी बैठका होणार आहेत. यापैकी शेवटच्या बैठकीत पाकिस्तानचा मुद्दा चर्चेत घेण्यात येणार आहे. पाकिस्तानसाठीचे हे अर्थसहाय्य एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होइल.आता सुमारे १.८ अब्ज डॉलर्स अर्थसहाय्य करणे शिल्लक आहे. जुलै महिन्यात १.२ अब्ज डॉलर्स अर्थसहाय्य करण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top