पाकिस्तानात निवडणूक प्रचारात समर्थकाने खरा वाघ आणला!

लाहोर :

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या निवडणूक प्रचार रॅलीत एक समर्थक प्रत्यक्ष वाघ घेऊन आला. ही घटना २२ जानेवारी रोजी घडली. वाघ हे पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज चे निवडणूक चिन्ह देखील आहे. नवाज यांना समर्थकाने प्रचार रॅलीत वाघ आणल्याची माहिती मिळताच त्यांनी लगेच त्याला परत पाठवण्यास सांगितले. नंतर पक्षाच्या प्रवक्त्या आणि माजी केंद्रीय मंत्री मरियम नवाज यांनी सोशल मीडिया पोस्ट करत समर्थकांनी अशा गोष्टी करू नयेत, अशी तंबी दिली. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला निवडणुका होणार आहेत.

नवाझ शरीफ हे लाहोरच्या एनए-१३० जागेवरून सार्वत्रिक निवडणूक लढवत आहेत. एनए-१३० म्हणजे राष्ट्रीय विधानसभेची जागा क्रमांक १३०. ते प्रचार रॅलीसाठी नवाज सोमवारी संध्याकाळी लाहोरला पोहोचले. यावेळी नवाज यांना माहिती मिळाली की, काही समर्थक वाघासह रॅली मैदानात पोहोचले आहेत. तो लोखंडी पिंजऱ्यात कैद होता. मात्र, त्याला पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली. नवाज यांनी तत्काळ पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्याला परत पाठवण्यास सांगितले. यानंतर त्याला आणलेल्या व्यक्तीने त्याला परतही नेले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top