पाकिस्तानात भरधाव बस दरीत कोसळली! २० जण ठार

रावळपिंडी- पाकिस्तानातील एका डोंगराळ भागात आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास एक भरधाव बस घसरून दरीत कोसळली. या भीषण अपघातात २० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर १५ जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

ही बस वायव्य पाकिस्तानातील गिलगिट-बातिस्तान भागातील दियामेर जिल्ह्यातील काराकोरम मार्गावरुन रावळपिंडीहून हुंजा येथे जात होती. मात्र आज पहाटे वाटेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस घसरून दरीत कोसळली. बसमध्ये प्रवास करणारे अनेक जण जखमी झाले. यात २० जणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. गिलगिट-बाल्टिस्तानचे मुख्यमंत्री हाजी गुलबर खान यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. गिलगिट-बाल्टिस्तान सरकारचे प्रवक्ते फैजुल्ला फाराक यांनी सांगितले की, अपघातानंतर चिलास रुग्णालयात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top