पाचगणीत अपघात टाळण्यासाठी रस्त्यांवर बहिर्वक्र आरसे लावले

पाचगणी- शहरातील काही रस्त्यांवर अशी काही वळणे आहेत की त्याठिकाणी अपघाताची शक्यता असते. हे अपघात टाळण्यासाठी पाचगणी रोटरी क्लबने एक अनोखा सामाजिक उपक्रम राबविला आहे. रोटरी क्लबने शहरातील अपघातप्रवण अशा १० ठिकाणी बहिर्वक्र आरसे बसविले आहेत.

पाचगणी रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी, सेक्रेटरी नितीन कासूर्डे यांनी शहरातील अपघात टाळण्यासाठी १० अपघातप्रवण ठिकाणी हे बहिर्वक्र आरसे बसविले आहेत.रस्त्यातील वळणावर समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात.हे अपघात होऊ नये म्हणून बहिर्वक्र आरशांची गरज होती. त्यामुळे हे आरसे लावण्यात आले. याबदद्ल रोटरी क्लबचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top