Home / News / पाच वर्षांत पहिल्यांदाच प्रिया दत्तकाँग्रेसच्या बैठकीला हजर राहिल्या

पाच वर्षांत पहिल्यांदाच प्रिया दत्तकाँग्रेसच्या बैठकीला हजर राहिल्या

मुंबई – काँग्रेसच्या नेत्या माजी खासदार प्रिया दत्त पाच वर्षात पहिल्यांदाच काल मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीला हजर राहिल्या.त्या वांद्रे पश्चिम...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – काँग्रेसच्या नेत्या माजी खासदार प्रिया दत्त पाच वर्षात पहिल्यांदाच काल मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीला हजर राहिल्या.त्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत,असे संकेत मिळाले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पक्षाच्या उत्तर, उत्तर-पश्चिम आणि उत्तर-मध्य जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला प्रिया दत्त उपस्थित होत्या. गेल्या आठवड्यात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रिया दत्त यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच प्रिया दत्त यांना काँग्रेस वांद्रे पश्चिममधून तिकीट देणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. काल प्रिया दत्त पाच वर्षांत पहिल्यांदाच काँग्रेसच्या बैठकीला हजर राहिल्याने या चर्चेला दुजोरा मिळाला.

Web Title:
संबंधित बातम्या