Home / News / पाडव्यापासून त्र्यंबकेश्वराचे ऑनलाईन दर्शन सुविधा

पाडव्यापासून त्र्यंबकेश्वराचे ऑनलाईन दर्शन सुविधा

नाशिक – ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने २ नोव्हेंबर रोजी दीपावली पाडव्याच्या मुहूर्तापासून ऑनलाईन दर्शन सुविधा सुरू करण्यात येत...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नाशिक – ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने २ नोव्हेंबर रोजी दीपावली पाडव्याच्या मुहूर्तापासून ऑनलाईन दर्शन सुविधा सुरू करण्यात येत असल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, सत्यप्रिय शुक्ल यांनी दिली.त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. यामुळे देवस्थानच्या वतीने ऑनलाईन दर्शन व्यवस्था खुली करण्यात आली. याआधीही हा प्रयोग झाला. मात्र तांत्रिक अडचणी अभावी हे काम रेंगाळले. आता दीपावली पाडव्यापासून उपक्रमास आरंभ होणार आहे. देवस्थानच्या वतीने दिवसभरातून चार हजार भाविकांना सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या