पाणी उकळून, गाळून पिण्याचे मुंबई महापालिकेचे आवाहन

मुंबईचे पाणी दूषित

मुंबई

मुंबईला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा होतो, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येतो. मात्र मुंबईचे पाणी दूषित असल्याचे पालिकेच्या वार्षिक पर्यावरण अहवालामधून उघडकीस आले आहे. त्यानुसार बी प्रभागातील उमरखाडी, डोंगरी, दादर, माटुंगा, सायन धारावीत सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी उकळून व गाळून घ्यावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.

मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी भांडूप येथे पाण्यावर प्रक्रिया केली जाते. मुंबईला दररोज करण्यात येणाऱ्या पाण्याची गुणवत्ताही तपासली जाते. तरीही पाण्याच्या नमुन्यात कोला बॅक्टेरिया आढळतात. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी दूषित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०२०-२१ मध्ये जलाशयातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली असता, ०.३ टक्के कोला बॅक्टेरिया आढळले होते. २०२१ मध्ये यात घट झाली. परंतु २०२२-२३ मध्ये दूषित पाणी असल्याच्या प्रमाणात वाढ झाली आणि ०.३ टक्के पाणी दूषित असल्याचे उघड झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top