पाथर्डी परिसरात दहशत पसरवणारा बिबट्या जेरबंद

नाशिक -शहरातील पाथर्डी आणि पिंपळगाव खांब परिसरातील शेतकर्‍यांच्या पशुधनावर हल्ला करून दहशत पसरविणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. पाथर्डी- नांदूर मार्गावर असलेल्या पोरजे यांच्या मळ्यात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झाला.

काही महिन्यांपासून पाथर्डीसह पिंपळगाव खांब, दाढेगाव आणि वडनेर परिसरात मळ्यांमध्ये राहणारे शेतकरी या बिबट्यामुळे भयभीत झाले होते.अधूनमधून बिबट्या दिसायचा. त्याने शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्लेही केले होते. शेतकऱ्यांनी वनविभागाकडे मदत मागितल्यानंतर वनविभागाने बिबट्याच्या ठशाचे नमुने घेत सुखदेव पोरजे यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. बिबट्या अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आठ ते नऊ वर्षांचा हा नर बिबट्या आहे. नाशिक पश्चिम वनविभागाचे वनसंरक्षक अधिकारी पंकज गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग परिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव,विजयसिंह पाटील,अशोक खानझोडे यांनी या बिबट्याला जाळ्यात पकडण्यासाठी प्रयत्न केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top