पालघर आणि बदलापुरच्या जांभळांना भौगोलिक मानांकन

पालघर – केंद्राच्या बौद्धिक संपदा विभागाने भौगोलिक उपप्रदर्शन पत्रिकेत ५० अर्जांना मान्यता देऊन भौगोलिक मानांकन देण्याचे निश्चित केले आहे.त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील बहाडोली आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या जांभळांचा समावेश आहे.दरम्यान,राज्यातील ९ वस्तू आणि कला व संस्कृतीशी संबंधित ४ अर्जांना मान्यता दिली आहे. त्यामध्ये पेणमधील गणेश मूर्तीं आणि सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांचा उल्लेख आहे.

गेल्यावर्षी जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास चॅरिटेबल ट्रस्ट तसेच बहाडोली येथील जांभुळ उत्पादक गटांनी पाठवलेल्या अर्जांना मान्यता मिळाली आहे.या जांभळांना एक वेगवेगळी ऐतिहासिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी आहे.त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे मानांकन दिले आहे.त्याचप्रमाणे नंदुरबारचे आमचूर,मिरची, लातूरच्या पानचिंचोळी येथील चिंच, बोरसुरी येथील तूरडाळ, कस्ती येथील कोथिंबीर, उदगीर येथील कुंथलगिरी खवा आणि बदनापुर जालना येथील दगडी ज्वारी, त्याचप्रमाणे सावंतवाडीतील लाकडी हस्तकला म्हणजेच खेळणी आणि मिरजेतील तानपुरा यांना मानांकन मिळाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top