पालिका शाळेत श्रीरामावर स्पर्धा

मुंबई – अयोध्येत येत्या २२ जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वार्थाने आदर्श अशा प्रभू श्री राम यांच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून मुंबई महापालिकेच्या शाळांमधून येत्या १ ते १५ जानेवारी दरम्यान श्रीरामावर आधारित ‘निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा’ आयोजित करण्यात यावी असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका शिक्षण विभागाला दिले आहेत. या निर्णयामुळे भावी पिढीला प्रभू श्री रामांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि प्रशासन कौशल्याबद्दल मार्गदर्शन मिळण्यास मदत होईल.उत्तर प्रदेशातील अयोध्येतील रामजन्मभूमीत रामलला विराजमान होणार आहेत. येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून देशविदेशातील महनीय व्यक्तींना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top