पालिकेच्या मैदाने दत्तक धोरणाला मुंबईकरांचा विरोध

मुंबई- मुंबईतील मोकळी मैदाने व क्रीडांगणाचे दत्तक धोरण मुंबई महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.परंतू या धोरणास मुंबईकरांनी विरोध केला आहे.मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल घेतलेल्या जनसुनावणीवेळी मुंबईकरांनी या आक्षेप घेतला.यावेळी पालकमंत्री लोढा यांनीही मुंबईकरांच्या भूमिकेला आपली सहमती दर्शवली.
मुंबईत ३०० पेक्षा जास्त मैदाने आणि क्रीडांगणे असून ती दत्तक तत्वावर देण्याचे पालिकेचे धोरण आहे.या जागा बॅंका, शाळा,गृहनिर्माण संस्था, व्यापारी खासगी संस्था, दुकानदार संघटना कार्पोरेट क्षेत्रातील कंपन्या विकसित करण्यासाठी घेण्यास तयार आहेत,असे पालिकेचे म्हणणे आहे.मात्र धोरणासंदर्भात घेतलेल्या जनसुनावणीत मुंबईकरांनी आक्षेप घेतल्याचे दिसून आले.या धोरणास अल्प प्रतिसाद मिळाला.यावेळी मनसेच्या प्रतिनिधीने भाजपची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी भाजपचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांच्याकडे केली.यावर शिरसाट यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि आमदार अमित साटम यांनी या पालिकेच्या धोरणास विरोध केला असल्याचे सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top