‘ पिंजरा ‘ चे प्रसिद्ध ढोलकी वादक पं.विठ्ठल क्षीरसागर यांचे निधन

पुणे- ‘पिंजरा ‘ फेम ज्येष्ठ ढोलकी वादक आणि आकाशवाणीचे निवृत्त तबलावादक,संगीतरत्न पं.विठ्ठल क्षीरसागर यांचे काल बुधवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. पंडित भीमराव कनकधर यांचे ते शिष्य होते.

पंडित विठ्ठल क्षीरसागर यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्रातील तमाम कष्टकरी जनतेच्यावतीने दलित स्वयंसेवक संघ व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था यांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. गेल्यावर्षी त्यांना संगीतरत्न हा पुरस्कार देण्यात आला होता.’पिंजरा ‘ या चित्रपटातील सर्वच गाण्यावर त्यांनी सोलो ढोलकी वादन केले होते. त्यांनी मराठी आणि हिंदी अशा २०० पेक्षा जास्त चित्रपटात ढोलकीवादन केले आहे. १९८४ ते २००३ या काळात ते आकाशवाणी पुणे केंद्रावर तबलावादक म्हणून कार्यरत होते.उत्तम ढोलकी वादक म्हणूनही ते लोकप्रिय होते.अनेक चित्रपटांसाठी त्यांनी ढोलकी आणि तबलावादन केले होते.त्यांचा ढोलकी,तबला आणि पखवाज वादनाचा तालयात्रा हा अल्बम खूप गाजला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top