पिंपरीतील 27 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पिंपरी – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 130 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातून 27 पोलीस निरीक्षक इतर ठिकाणी गेले असून राज्याच्या विविध घटकांमधून 24 पोलीस निरीक्षक पिंपरी चिंचवड शहरात आले आहेत.

स्वग्राम जिल्ह्यात नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व 30 जून 2024 पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्ष कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदलीवर हजर झालेल्या पोलीस निरीक्षकांना घटकांतर्गत पदस्थापना देताना त्यांची मूळ जिल्ह्यात नेमणूक झाली असेल तर कार्यकारी पद देता येणार नसल्याचे बदली आदेशात म्हटले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी बदलीचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top