पिंपरी-चिंचवड जलतरण तलावात क्लोरिन गॅस गळतीने घबराट

११ जण रुग्णालयात दाखल

पिंपरी –

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कासारवाडी येथील जलतरण तलावात क्लोरिन गॅसची गळती झाली. यामुळे तलावात पोहण्यासाठी आलेल्या २० ते २२ जणांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. ही धक्कादायक घटना आज सकाळी घडली. हा गॅस पसरल्याने तेथील नागरिकांना खोकला, घशाचा त्रास, श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने या जलतरण तलावासमोरील वाहतूक बंद केली. तसेच त्रास होत असलेल्या ११ लोकांना उपचारासाठी महापालिका वायसीएम रुग्णालयात दाखल केले. या घटनेने परिसरात काही काळ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या तलावाजवळील रस्त्यावरील वाहतूकही काही काळ थांवबण्यात आली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top