पिरंगुट घाटात अग्नितांडव धावती बस आगीत खाक

पुणे

पुण्यातील पिरंगुट घाटात काल रात्री धावत्या बसने पेट घेतला. या आगीत बस जळून खाक झाली. बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जिवीतहानी टळली.

काल रात्री १० च्या सुमारास मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाट उतरताना बसमधून धूर येऊ लागला. चालकाच्या हे लक्षात येताच त्याने बस थांबवली. चालकाने तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर बसने पेट घेतला. अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु बसला आग लागल्यामुळे सर्व प्रवाशी गोंधळले होते. ते मदतीसाठी आरडाओरड करत होते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top